बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोवॅक्सिन ही 12 वर्षांवरील मुलांना देण्यास मान्यता मिळाल्याच्या व्हायरल मेसेज मागचं सत्य वाचा

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

लसी संदर्भात अनेक खोटे मेसेजेस आणि अफवा नागरिकांमध्ये पसरविल्या जात असल्याचं दिसून येत आहे. अशातच एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या मेसेजमध्ये दावा करण्यात आला होता की, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना भारत बायोटेक ची कोवॅक्सिन ही लस देण्यास सरकारकडुन मान्यता दिली गेली आहे.

या व्हायरल मेसेज मागचं वास्तव मात्र काही वेगळंच आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने यासंदर्भात ट्विट करत सरकारने अशा प्रकारचा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. तसेच हा व्हायरल मेसेज पूर्णतः खोटा आहे. असं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून स्पष्ट केलं आहे. सध्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे जे नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत, अशा नागरिकांनाच कोरोना लस दिली जाईल.

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांना आणि खोट्या व्हायरल मेसेजला बळी पडू नये, तसेच सरकारी आदेश आल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नये. अशा घटनांमुळे समाजामध्ये चुकीचा मेसेज पसरून नागरिकांची गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व प्रकरणात 12 वर्षांवरील मुलांना कोरोनाची लस देण्याचा जो दावा मेसेजमध्ये करण्यात आला होता. तो पूर्णतः खोटा होता, हे स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘उगाच कुणाच्या घरी जाऊ नका, त्यांच्याशी….’; गडकरींचा फडणवीसांना प्रेमळ सल्ला

देशातील 3 राज्यांमध्ये मागच्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

‘स्तनपानाला अजुनही आपल्याकडे…’; मातृदिनानिमित्त अमृता रावने व्यक्त केली खंत

पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली

“गडकरींकडे जबाबदारी देण्याचा सल्ला मानला असता तर कोरोना नियंत्रणात असता”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More