बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा आजची आकडेवारी!

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 236 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 119 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 03 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,89,021 इतकी आहे. तर पुण्यात 3007 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8816 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,78,119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-

पावसाचं पुन्हा कमबॅक! राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

नीरज मराठाच, त्याच्या घरी मी जाऊन आलोय- खासदार संभाजीराजे

“400 कोटींच्या भूखंडासाठी रानडेचं स्थलांतर”, माजी विद्यार्थ्यांच्या आरोपांनी विद्यापीठात खळबळ

ईडीचा अविनाश भोसलेंना दणका, केली ‘ही’ मोठी कारवाई!

भाजप असं आडवं पडलं आहे की आम्ही इथून उठणारच नाही- संजय राऊत

2014 पासून देशाला ग्रहण लागलं- नाना पटोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More