बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा आजची आकडेवारी!

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 244 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 139 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 05 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 209 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,88,293 इतकी आहे. तर पुण्यात 3007 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8797 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,77,048 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 8469 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-

राज्यपालांसारखा कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही- अमृता फडणवीस

खूशखबर! ‘आयडीबीआय’ बॅंकेत इतक्या जागांसाठी मोठी भरती, 18 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत!

रौप्य पदक मिळवत इतिहास रचणाऱ्या रवीकुमार दहियावर बक्षिसांचा वर्षाव; 4 कोटी, गावात स्टेडियम अन्…

‘हा’ पॅक त्वचेला लावा आणि मिळवा सुंदर त्वचा!

सुवर्ण पदक हुकलं पण भारतीयांचं ह्रदय जिंकलंस! अंतिम लढतीत रवीकुमार दहियाचा पराभव

मुंबईप्रमाणे जगभरातही पूरस्थिती, तिथल्या महापालिका आमच्या हातात नाहीत- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More