बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात दोन दिवसांच्या वाढीनंतर पुन्हा कोरोना रूग्णसंख्येत घट; वाचा आजची आकडेवारी

मुंबई | राज्यात कोरोनाची लाट ओसरत असताना गेल्या दोन दिवसांपासुन कोरोना रूग्णांचा आकडा वाढताना दिसत होता. परंतु महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. रूग्णाची संख्या कमी होत असली तरी विनाकारण घराबाहेर पडणं आपल्या सर्वांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे  राज्य सरकारने ठरवून दिलेले निर्बंध पाळणे आवश्यक आहे.

दिवसभरात राज्यात 04 हजार 831 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 04 हजार 455 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 126 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 62 लाख 59 हजार 906 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 97.02 टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

थोडक्यात बातम्या- 

काबूल हल्ल्यात भारतीय कनेक्शन?; आली ही धक्कादायक माहिती समोर

‘… अन्यथा जेलभरो आंदोलन करू’; अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला अल्टीमेटम

“अनिल परब यांना ठाकरे सरकारने स्वतःहून अटक केली नाही तर…”

काबूल विमानतळाबाहेर चकमक; अमेरिकन सैन्याकडून चोख प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांचा विरोध केला म्हणून पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More