बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोशल मीडियावरही रुजतेय वाचनसंस्कृती, ‘वाचनवेडा’ फेसबुक ग्रुप करतोय कमाल!

मुंबई | 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. ‘इन्फॉर्मेशन इस वेल्थ’ असं इंग्रजीत म्हणतात. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा आपण ठरवलं तर चांगला वापर करू शकतो. आपण दिवसभरात किमान 10 वेळा तरी इन्स्ट्राग्राम आणि फेसबुकवर फेरफटका मारत असतो. याच फेसबुकचा पुरेपुर वापर करत काही लोकांनी मिळून भन्नाट उपक्रम चालू केला आहे. काही पुस्तक प्रेमींनी एकत्र येऊन ‘वाचनवेडा’ हा ग्रुप चालू केला. काही काळातच हा ग्रुप लोकप्रिय झाला आणि आज या ग्रुपवर तबबल 54 हजार वाचनवेडे आहेत.

वाचनवेडा ग्रुपवर लेखक, विचारवंत यांच्यासोबत सामान्य नागरिक सुद्धा आहेत. पुस्तकातील वाचनासंबंधी विविध मुद्यावर या ग्रुप मध्ये चर्चा होते. एखादं पुस्तक आवडलं तर त्याचा फोटो काढून त्याबद्दल अभिप्राय लिहला जातो. तसेच मानांकित लेखकांच्या गाजलेल्या पुस्तकांसोबत नवीन लेखकांची पुस्तके सुचवली जातात. तसेच लहान मुलांसाठी देखील असाच उपक्रम राबवला जातो.

लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक पुस्तकांकडे वळले. भरपूर वेळ असल्याने लोक पुस्तक वाचू लागली. मात्र काही लोकांना कोणती पुस्तकं वाचावीत हे सुचत नव्हतं. कोणत्या लेखकांची पुस्तकं चांगली असतात? कोणत्या लेखकांच्या कथा चांगल्या असतात? असे अनेक प्रश्न लोकांना पडत होती. यातूनच फेसबुकवर वाचनवेडा या ग्रुपची निर्मिती झाली होती. आता या ग्रुपचे सध्या 54 हजार सदस्य बनले आहेत.

‘पुस्तक भिशी’ सारखे उपक्रमही फेसबुकवर सुरू आहेत. जशी पैशाची भिशी असते ज्यात आपला नंबर लागल्यावर पैसे मिळतात. त्याचप्रमाणे इथे पैशाच्या ऐवजी पुस्तके मिळतात. ती पण सर्व स्वस्त दरात यासाठी सदस्यांकडून आठवड्याला ठराविक रक्कम गोळा केली जाते. त्यानंतर त्यांच्या आवडीच्या पुस्तकांची यादी मागवली जाते. या यादीत ज्यांचा नंबर येईल त्यांच्या घरी ही पुस्तके पाठवली जातात. अशा प्रकारच्या उपक्रमामधून सोशल मीडियावरही वाचनसंस्कृती रुजताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

देशात कोरोनाचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

‘IFFLA’मध्ये मराठमोळ्या अक्षय इंडीकरची मुलाखत घेणार अनुराग कश्यप!

आणखी किती बळी हवेत म्हणजे नॅशनल न्यूज होईल- प्रविण दरेकर

मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; पोलीस निरीक्षक सुनिल माने यांना अटक

यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण म्हणून या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही- राज ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More