बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला शह देण्याची तयारी, पवारांच्या तीन पिढ्या मैदानात!

मुंबई | राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये 2017 साली राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. महापालिका निवडणुकीत भाजपने पिंपरी चिंचवड महापालिकेवर आपला झेंडा फडकवला होता. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आता पवार कुटुंबाच्या तीन पिढ्या मैदानात उतरल्या असल्याचं दिसून येत आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून पार्थ पवार पिंपरी चिंचवड शहरात शड्डू ठोकला आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून अजित पवारांनी देखील पिंपरी चिंचवडकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. भाजपमध्ये नाराज असलेल्या व्यक्तींना जवळ करण्याचं धोरण देखील अजित पवार आखल्याचं दिसून येतंय. पण तरीही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज असल्यानं यात आता शरद पवारांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

अजित पवार पक्षबांधणी करत असताना काही जुन्या नेत्यांना डावलत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे काही नेत्यांनी अजित पवारांऐवजी थेट शरद पवारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. या नेत्यांच्या विनंतीला मान ठेवून शरद पवार देखील पिंपरी चिंचवडचा दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून पार्थ पवार पिंपरी चिंचवडमध्ये तळ ठोकून बसले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणुकीची जबाबदारी आता पार्थ पवारांच्या खांद्यावर देण्यात आल्याचं समोर येतंय. त्यामुळे आता तरूण कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येतंय. तर राज्यातील अनेक महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“कर्ज मिळवताना 7 पिढ्या जातात, तुम्हाला 7 तासात 85 कोटींचं कर्ज मिळालंच कसं?”

अनिल देशमुखांना मोठा धक्का! अखेर ‘या’ बहुचर्चित पंचायत समितीवर भाजपचा कब्जा

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

“महाविकास आघाडी सरकारला आत्मचिंतनाची गरज, एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे”

मोठी बातमी! अखेर प्रियंका आणि राहुल गांधींना लखीमपूर खेरीला जाण्यास परवानगी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More