आयफोनला टक्कर देण्यासाठी रियलमीचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत

Realme C63 l स्मार्टफोन प्रेमींसाठी Realme ने नवीन स्मार्टफोन Realme C63 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक जबरदस्त फीचर्स उपलब्ध आहेत. सध्या या फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल प्रचंड चर्चा होत आहे. कारण कमी बजेट रेंजमध्ये तुम्हाला या फोनमध्ये 45W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा मिळत आहे.

Realme C63 स्पेसिफिकेशन काय आहे? :

हा फोन सध्या इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये, 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलसह किंमत 10,000 रुपये आहे. याशिवाय, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत भारतात 12,000 रुपये इतकी आहे.

या Realme फोनमध्ये तुम्हाला 90Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.74-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळणार आहे. तसेच 450nits च्या पीक ब्राइटनेस, जो 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह येत आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 45W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे, जो 5,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. फोनच्या बॅटरीबाबत कंपनीचा दावा आहे की, एक मिनिट चार्ज केल्यानंतर तो एक तासाचा टॉकटाइम देऊ शकतो.

Realme C63 l दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार :

तुम्हाला या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, ड्युअल रिअर कॅमेरा मिळणार आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. या Realme फोनमध्ये ड्युअल-सिम सपोर्टसह सर्वोत्तम Realme UI 5 Android 14 वर दिसणार आहे.

Realme च्या या फोनच्या रंगाविषयी बोलायचे झाले तर, हा दोन प्रकारात सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये लेदर ब्लू आणि जेड ग्रीन कलरचा समावेश आहे. तसेच Realme C63 फोन Unisoc T612 चिपसेट, Mali-G57 GPU आणि 8GB रॅमने सुसज्ज आहे. जर तुम्ही कमी किंमतीत सर्वोत्तम स्मार्टफोन शोधत असाल तर हा फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

News Title – Realme C63 Smartphone Launched

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका, दुधाच्या किंमतीत वाढ

आज या राशीच्या राजकीय व्यक्तींना जनतेचा पाठिंबा असल्याचं दिसून येईल

‘…नाहीतर मी स्वत:ला संपवून घेईन’; बजरंग सोनवणेंच्या वक्तव्याने खळबळ

कुठे ऊन, कुठे पाऊस; वाचा हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज

राज्यातील एक्झिट पोलवर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…