बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron बाबत दिलासादायक माहिती, अशी वाढेल रोगप्रतिकारशक्ती

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांची (Corona Virus) संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातचं आता ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्यादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. मात्र आता ओमिक्रॉनबाबत एक दिलासादायक माहिती समोर येत आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंट कोरोना लसीचा प्रभाव कमी करत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात ओमिक्रॉनबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. कोरोना लसीचा तिसरा डोस ओमिक्रॉनविरोधात प्रतिकारशक्ती 88 टक्क्याने वाढवत असल्याचं समोर आलं आहे.

बुस्टर डोस दुसऱ्या डोसच्या तुलनेत ओमिक्रॉनविरोधात जास्त प्रतिकारशक्ती निर्माण करत असल्याचं समोर आलं आहे. मात्र, या 6 महिन्यानंतर शरीरावर या लसीचा परिणाम कमी होऊ लागतो. 6 महिन्यानंतर लसीचा ओमिक्रॉनविरोधात परिणाम केवळ 52 टक्क्यापर्यंत राहतो.

दरम्यान, तिसरा बुस्टर डोस मोठ्या प्रमाणात रोग प्रतिकारशक्ती वाढवितो. त्याचबरोबर कोरोना विरोधातील संसर्गाची शक्यता कमी करतो. तिसरा डोस घेतल्यानंतर शरीरात लसीचा परिणाम 52 टक्क्यावरून वाढून 88 टक्के होतो. त्यामुळे तिसरा डोस घेणं कोरोनाविरोधात लढण्यासाठी फायदेशीर राहतो.

थोडक्यात बातम्या-

“वेळ आली तर…”; राजेश टोपेंचा महाराष्ट्राला मोठा इशारा

नाईट कर्फ्यूबाबत वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले…

आरोग्य सचिवांचं कोरोनाबाबत धक्कादायक वक्तव्य, म्हणाले…

‘कोरोना महामारीच्या अनेक लाटा येतील कारण…’”; तज्ज्ञांचा धक्कादायक खुुलासा

“नवीन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवायचा आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More