बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘संजय राऊत मुर्ख माणूस, त्यांनी फक्त…’; राऊतांवर टीका करताना शिरसाटांची जीभ घसरली

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात जवळ-जवळ 40 आमदारांचा समावेश होता. बंडखोर आमदारांची शिवसेनेसोबत बंड करण्याची कारणं सतत बदलत होती. कधी निधी मिळत नसल्याचं तर कधी पक्षश्रेष्ठी लक्ष देत नसल्याचं कारण बंडखोर आमदार देत होते. यात एक कारण मात्र सगळ्याचं स्पष्ट होतं ते म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut). राऊतांची भाषा योग्य नसल्याचा अनेकांनी आरोप केला. आता पुन्हा एका बंडखोर आमदारांनी राऊतांवर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणतात स्वाभिमान(self respect) असेल तर दुसरा पक्ष काढा, बाळासाहेबांच नाव वापरू नका. यावर प्रत्युत्तर देताना शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत हा मुर्ख माणूस आहे. उद्या जर कोणी म्हणलं की शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच नाव वापरू नका, तर कसं चालेल? बाळासाहेब ठाकरे देखील आता त्याच स्तरावर चालले आहेत. याचा अभिमान असला पाहिजे. असं बंडखोर आमदार संजय शिरसाट माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संजय राऊतांवर बोलणं मला योग्य वाटत नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackery) छोटं केलं आहे. आता शिवसेनाप्रमुखांना देखील छोटं करायचं काम राऊत करत आहेत. शिवसेनाप्रमुख हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे नेते आहेत. राऊतांना राजकारण माहित नाही. त्यांनी वर्तमानपत्र चालवावं, दुसरं काही करू नये, असा टोला शिरसाटांनी लगावला.

दरम्यान, राऊतांचं आणि बंडखोर आमदारांचे अंतर्गत आरोप-प्रत्यारोप सत्तांतरानंतरही सुरूच आहेत. शिवसेनेत झालेल्या या बंडखोरीमागचं खापर संजय राऊतांवर फोडलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या 

जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यामागे भाजपची ‘ही’ मोठी खेळी?

सुष्मितासोबतच्या नात्याची कबूली दिल्यानंतर ललित मोदी ‘या’ कारणामुळे माध्यमांवर संतापले, म्हणाले..

‘हे बरोबर नाही’, कतरिनाच्या वाढदिवशी नेटकरी विकीवर संतापले

मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेले नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात क्लार्क, दलेर मेंहदीही साथीला

संजय राऊतांनी गजनी सिनेमा पहावा, आशिष शेलारांचा खोचक सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More