बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदेंचा खून करण्याचा प्रयत्न होता का? असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा न देण्याचा आदेश हा वर्षा बंगल्यावरुन आला होता असा गौप्यस्फोटही सुहास कांदे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. याकाळात माओवाद्यांनी एकनाथ शिंदेंची हत्या करण्याचा कट रचला होता. हे माहित असतानाही एकनाथ शिंदेंना तेव्हाच्या सरकारकडून झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आलेली, असं कांदेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, सुहास कांदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता शंभूराज देसाई यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आल्यानंतर यावर दोन्ही सभागृहात चर्चाही झाली होती, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

’13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर…’; मोदींचं जनतेला आवाहन

“गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, तुमची तेवढी लायकी नाही”

शिंदे सरकारचा गणेश मंडळांना दिलासा, परवानगी मिळवण्यासाठी ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया

‘सोनिया गांधी, राहुल गांधी असोत किंवा संजय राऊत…’; ईडी चौकशीवरून राऊतांचं मोठं वक्तव्य

“… त्या बरोबर म्हणाल्या, आदित्य ठाकरे हा महाराष्ट्राचा पप्पूू आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More