बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आश्चर्यकारक! ‘या’ महिलेने एकाचवेळी दिला 10 मुलांना जन्म

नवी दिल्ली | अनेक वेळा आपण ऐकतो की एखाद्या महिलेला जुळे मुलं झालेत नाही तर बऱ्याच वेळा एकाच वेळी महिला तीन मुलांना जन्म देते. मात्र एकाच वेळी एकाच महिलेने 10 मुलांना जन्म दिल्याची बातमी समोर आली आहे. या महिलेचं नाव गोसियामी थमारा सिटहोल असं आहे.

संबंधित महिला गरोदर राहिल्यानंतर डाॅक्टरांकडे दाखवायला गेली होती. यावेळी डाॅक्टरांनी त्यांना 6 मुलं होतील असं सांगितलं होतं. तसेच गोसियामी यांच्या पतीला आपल्या पत्नीला 8 मुलं होतील असं वाटत होतं. मात्र डिलेव्हरी नंतर या महिलेनं चक्क 10 मुलांना जन्म दिला आहे. विशेष बाब म्हणजे सर्व 10 मुलं निरोगी जन्मली आहेत.

या प्रकारातील धक्कादायक बाब म्हणजे गरोदर आसताना गोसियामी एकदा आजारी देखील पडल्या होत्या. यादरम्यान त्यांची एक चुक त्यांच्या मुलांना धोकादायक असू शकते हे त्यांना माहित होतं. यावेळी त्यांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या होत्या. तसेच त्यांच्या पायात आणि कंबरेत देखील सतत वेदना येत होत्या. अशात देखील आपली मुलं निरोगीच जन्मली पाहीजे असं गोसियामी यांना वाटत होतं.

दरम्यान, गोसियामी यांचं 10 ही मुलं निरोगी जन्मल्यामुळे सर्व परिवार देखील खुश आहे. यामध्ये गोसियामींनी 7 मुली आणि 3 मुलांना जन्म दिला आहे. मुलं निरोगी असली तरी देखील त्यांना काही दिवस इनक्यूबेटरमध्ये रहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

नदी पार करण्यासाठी कोरोना योद्धांनी लढवली अनोखी शक्कल, फोटो होतोय व्हायल

…अन् बेस्ट बसच्या ड्रायव्हर काकांनी बसमध्येच उघडली छत्री, पाहा व्हिडीओ

‘पंतप्रधानांच्या भेटीला विरोधी पक्षाला सोबत घ्यायला हवं होतं’; फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर

“माझं भारतात पाऊल पडताच कोरोना संपणार”

शाब्बास रे पठ्ठ्या! सर्वाधिक गोलच्या स्पर्धेत भारताचा सुनिल छेत्री मेसीपेक्षा सरस

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More