बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

RRR Day 2 Collection! दुसऱ्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

मुंबई | बहूप्रतिक्षीत आरआरआर सिनेमा प्रदर्शीत झाल्यानंतर बाॅक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाईच्या शर्यतीत समाविष्ट झाला आहे. आरआरआर सिनेमानं अवघ्या जगात आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सुरूवात केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सिनेमानं विक्रमी कमाई केली.

पहिल्या दिवशी 150 कोटींहून अधिक कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 43.82 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. आरआरआर सिनेमामध्ये ज्यूनिअर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट, अशी स्टारकास्ट आहे.

पहिल्या दोन दिवसानंतर आता आठवड्याचा शेवट असल्यानं विकेंडला कमाईचे नवे उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपट समीक्षकांनी देखील चित्रपटाला चांगल्या रेटींग दिल्या आहेत. परिणामी चाहते चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

दरम्यान, दाक्षिणात्या चित्रपटांचा बाॅक्स ऑफिसवर दबदबा वाढत असल्याचं सध्यातरी पाहायला मिळत आहे. बाहूबली, केजीएफ, जय भीमनंतर आता आरआरआर सिनेमा देशभर गाजत आहे.

पाहा ट्विट – 

 

थोडक्यात बातम्या – 

“मला वाटतं खूप काहीतरी होणार आहे”; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ

“अजितदादा तुम्हीच राज्य चालवताय, मुख्यमंत्री कधीतरी दिसतात”

राजमौलींच्या ‘RRR’ची बॉक्स ऑफिसवर जादू, पहिल्याच दिवशी मोडले कमाईचे सर्व रेकॉर्ड

“संजय राऊतांचं ‘हे’ वक्तव्य म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे”

“एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावं, कोणाचीही नोकरी जाणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More