मुंबई | संपूर्ण राज्यभरात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातलं होतं. त्यातच कोरोनाच्या दुसर्या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. परंतु ही रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 870 सक्रिय रुग्ण आहे. राज्यात 136 रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासांत दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे.
राज्यात आतापर्यंत 77,25, 919 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 95, 26, 982 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
दरम्यान, रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या संख्येतही दिवसेंदिवस घट होत आहे. अशातच आजची राज्यातील दिलासादायक आक़डेवारी समोर आली आहे.
थोडक्यात बातम्या –
मशिदींवरील भोंगे उतरवणार का?; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…
सोनिया गांधी अॅक्शन मोडवर; आगामी काळात मोठा निर्णय घेण्याची शक्यता
अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, पाहा फोटो
“संजय राऊत यांना लवकर घोड्यावर बसवून तुरूंगात पाठवा”
राजू शेट्टीचा महाविकास आघाडीला जोर का झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed.