बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नोकरीची सुवर्णसंधी; कोकण रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

नवी दिल्ली | देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर काहीचे उद्योगधंदे बंद झाले. सरकारी नोकऱ्या देखील कमी झाल्या आहेत. तर काही सरकारी परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. अशात चांगली बातमी समोर आली आहे. तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध पदांसाठी अर्ज मागविलेत. त्याअंतर्गत कोकण रेल्वे सहाय्यक लेखा अधिकारी, लेखा सहाय्यक आणि उपमहाव्यवस्थापक वित्त यांच्या पदांवर भरती होणार आहे.

लेखा सहाय्यक पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीकॉम पदवी घेतली पाहिजे. तर सहाय्यक लेखा अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सीएमए आणि सीए पदवी असणे आवश्यक आहे. विभाग अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीकॉम पदवी घेतली पाहिजे. डेप्युटी जनरल मॅनेजर फायनान्स पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये सीएमए आणि सीए असावेत.

पात्र उमेदवार संपूर्ण तपशीलवार अधिसूचना वाचू शकतात आणि अधिकृत वेबसाईट konkanrailway.com वर भेट देऊन अर्ज करू शकता. अर्ज करताना उमेदवारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जुलै आहे. एकूण 11 पदे भरती केली जाणार आहेत. लेखा सहाय्यकाची 7, सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांची 2 आणि विभाग अधिकाऱ्यांची 2 पदे भरती करण्यात येणार आहेत.

थोडक्यात बातम्या- 

भाजप मनसेला टाळी देणार का?; मनसे-भाजप युुतीबाबत फडणवीस म्हणाले…

अनलॉकचे पाच टप्पे निश्चित; सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर

फेसबुकचा डोनाल्ड ट्रम्प यांना झटका; केली ही मोठी कारवाई

…तोपर्यंत कुणी माईचा लाल हे सरकार पाडू शकत नाही- अजित पवार

“एका मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More