बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ भागांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

पुणे | पावसाने (Rain Update) गेल्या आठवड्यापासून पुन्हा हजेरी लावली आहे. पावसामुळे राज्यातील काही भागात मोठे नुकसान झाले आहे. राज्यात पावसामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 200 च्यावर गेला आहे. तसेच काही भागात अनेक घरांचे आणि शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी काही नेत्यांनी सरकारकडे केली होती. त्यातच आता काही ठिकाणी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

कोकण, गोव्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे, रत्नागिरीमध्येही सध्या पाऊस सुरूच आहे. त्याचाच परिणाम आता पश्चिम घाटावर दिसून येत आहे. पुणे, सातारा जिल्हातील घाट परिसरात सोमवारी काही ठिकाणी हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे (Pune)आणि सातारा(Satara) जिल्हातील घाट परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवस या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी आकाश पूर्ण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने सर्वांनी सतर्क रहावं.

दरम्यान, पुणे शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी ऊन पडले होते, त्यामुळे श्रावणातील ऊन-सावलीचा निसर्गरम्य खेळ रविवारी पाहायला मिळाला. पण पुढील तीन दिवस पुण्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने पुणेकरांनी काळजी घ्यावी.

थोडक्यात बातम्या-

“तुम्ही स्वाभिमानी असाल तर, महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून सोडवा”

मोठी बातमी! संजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं, प्रमाणपत्र रद्द

मोठी बातमी! बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?

पुणेरी पाटी पाहताच अमृता फडणवीसांना आठवले एकनाथ शिंदे, म्हणाल्या…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More