बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

मुंबई | पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस पडले असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज, तर मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या धरण क्षेत्रात पुढील तीन-चार दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातदेखील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. 15 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात असेच हवामान कायम राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात काल म्हणजेच 12 जुलैपर्यंत 360.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. 40 दिवसांत मान्सूनने संपूर्ण भारताचा प्रवास केला. दिल्लीत तब्बल 19 वर्षांनंतर मान्सून उशिराने दाखल झाला असून याआधी 2002 साली मान्सून 19 जुलै रोजी दिल्लीत दाखल झाला होता.

थोडक्यात बातम्या- 

महाविकास आघाडीतील वाद शरद पवारांच्या दरबारात?; काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

“नानांच्या बोलण्यानं राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का?”

“इंदुरीकर त्यांच्या कीर्तनातून महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा ही कुठे होती ?”

विद्यार्थ्यांना आता ‘या’ देशात शिकण्याची संधी; राज्यपालांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More