बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ तीन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

पुणे | महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं असतानाच महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुणे, सातारा, रत्नागिरी व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोर धरत असताना पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाने महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना आज रेड अलर्ट दिला आहे. सातारा, पुणे आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना हवामान विभागातर्फे रेड अलर्ट देण्यात आला असून या तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

नागरिकांनी गरजेचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागातर्फे या तीन जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुण्यात पावसाने दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट मिळाल्यामुळे पावसाबद्दलची भीती नागरिकांमध्ये दिसून येत आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या –

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता अशाप्रकारे 4000 रुपये मिळवता येणार; वाचा सविस्तर

“12 सदस्यांची नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी वाढदिवसानिमित्त राज्याला गोड भेट द्यावी”

‘समांतर 2’ वेब सिरीज ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

होय, शिवसेना गुंडगिरी करते आम्ही सर्टिफाईड गुंड, सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता तर…

राखी सावंतनं सांगितली लस घेण्याची अनोखी पद्धत, म्हणाली….

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More