सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट जारी

Weather Updates l राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाने सोमवारी सायंकाळपासून काही भागांमध्ये उसंत घेतली असली तरीही हा पाऊस राज्यात पुन्हा एकदा जोर धरणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अशातच पुढील 24 तासांमध्ये हा मान्सून मराठवाडा आणि विदर्भात जोर वाढवणार असल्याचं चित्र दिसत आहे.

राज्यातील काही भागात अलर्ट जारी :

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांमध्ये पाऊस दुप्पट ताकदीनं कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच मुंबई शहराला ठप्प करणारा मुसळधार पाऊस पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा जोमाने हजेरी लावणार असल्याचा अंदाज वारवण्यात आला आहे. याशिवाय मुंबई शहरातील किनारपट्टी व भागांना सध्या सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना गरज असल्यासच घराबाहेर पडण्य़ाच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

मुंबई शेजारील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. यानुसार राज्यातील पालघर, रायगड व ठाणे जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज तर काही निवडक भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पश्चिमेकडे येणाऱ्या सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यासाठी देखील हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे.

Weather Updates l या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी :

हवामान विभागाच्या माहितीनुसार मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, तिथं विदर्भातील अकोला,अमरावती, यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा असून, काही विभागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या 48 तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळं कोल्हापूर व रायगड भागांमधील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे छोटामोठा जलप्रवाह सुद्धा मोठ्या ताकदीनं वाहू लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या वाहू लागल्या आहेत.

News Title – Red Alert in Mumbai, Orange in Vidarbha

महत्वाच्या बातम्या-

मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्ट्या जाहीर, पाहा कुठे कुठे असणार सुट्ट्या

आजपासून ‘या’ राशीधारकांचा सुवर्णकाळ सुरु; नशीब चमकणार

‘अशा’ व्यक्तींपासून होईल तितकं दूर राहा; आयुष्यात सुख-समृद्धी चालून येईल

“खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत?”;जितेंद्र आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची मान्यता