आजपासून लाल दिवा हद्दपार, अत्यावश्यक सेवांना निळा दिवा

नवी दिल्ली | भारतात आजपासून लाल दिव्याच्या गाड्या आजपासून पहायला मिळणार नाहीत. देशातील व्हीआयपी कल्चर नष्ट करण्यासाठी मोदी सरकारने लाल दिव्याच्या गाड्या हद्दपार करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी होणार आहे. 

21 एप्रिल रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाल दिवे हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच निळा दिवा वापरला जाईल. यामध्ये पोलीस, अग्नीशमन दल आणि रुग्णवाहिका यासारख्या सेवांचा समावेश आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

3 Comments

  1. सर याचे अँप पण बनविले आहे का असेल तर त्याचे लिंक द्या thanks

    • सध्या अॅप नाहीये. काम सुरु आहे. लवकर अॅपविषयी कळवू…

Comments are closed.