भिवंडी | भिवंडीत कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याने चांगलाच धुडगूस घातला आहे. मालकाच्या तावडीतून सुटून बंदर मोहल्ल्यात ही घटना घडली आहे.
मालकाच्या तावडीतून सुटून या रेड्याने रस्त्यावर धुडगूस घातला. यावेळी तेथील पादचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. एवढेच नाही तर या रेड्याने तेथील चारचाकी आणि दुचाकी वाहनांचं नुकसान केलं आहे. हा प्रकार समजल्यावर भोईवाडा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रेड्याला जेरबंद केलं.
दरम्यान, अद्याप रेड्याच्या मालकाची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात मालकाविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 336 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-निवडणुकांपुर्वी जाणूनबुजून समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय!
-ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे दिल्लीत निधन
-गुन्ह्यांमध्ये वाढ; राज्य सरकारचा मात्र पोलीस भरतीकडे कानाडोळा
-मी कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही- राज ठाकरे
-पुण्याच्या मगर-सातव कुटुंबातले सात जण अचानक बेपत्ता