महाराष्ट्र मुंबई

आणखी स्वस्त झाली कोरोना चाचणी; जाणून घ्या काय आहेत नवीन दर!

मुंबई | कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात केली असून आता चाचणीसाठी 980 रुपयांऐवजी 700 रुपये हा दर निश्चित करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर हा 0.21 इतका असून. केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही, असं राजेश टोपेंनी सांगितलं.

राज्य शासनाने कोरोना उपाययोजनांसंदर्भात निर्णय घेताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून निर्णय घेतले, असं राजेश टोपे म्हणाले.

राज्यात कोरोना काळात सर्व नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली. त्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत रक्त देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय पंतप्रधान मोदींना जात- मुकेश अंबानी

कोरोनाची लागण झालेले मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली

भाजप हीच खरी तुकडे तुकडे गँग- सुखबीर सिंग बादल

ईडीचा वापर तुम्ही कसा करताय? मुख्यमंत्र्यांचा भाजपला सवाल

70 वर्षीय शेतकऱ्याचा सिंघू सीमेवर आंदोलनादरम्यान मृत्यू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या