बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) कंपन्यांसाठी एलपीजी ग्राहकांसाठी खुशखबर आहे. 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरचे दर कमी करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. त्यामुळे नववर्षाच्या मुहुर्तावरवर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

IOCL नुसार 1 जानेवारीपासून कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 102 रुपयांनी कमी होऊन 1998.50 रुपये झाली आहे. 31 डिसेंबर रोजी 19 किलो कमर्शिअल गॅस सिलेंडरचे दर 2101 रुपये होते. मात्र दर कमी केल्यानंतर आता चैन्नईमध्ये हा दर 2131 रुपये , मुंबईत 1948.50 रुपये तर कोलकाता येथे 2076 रुपये झाला आहे.

कमर्शिअल गॅसच्या किमती कमी झाल्या असल्या तरी घरगुती गॅसच्या किमती मात्र कमी करण्यात आल्या नाहीत. दिल्ली आणि मुंबईमध्ये नॉन सबसिडीच्या 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरचे दर 899.50 रुपये आहेत. तर कोलकात्यात गॅस सिलेंडरची किंमत 996 रुपये आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना अजूनही दिलासा मिळाला नाही.

दरम्यान, घरगुती सिलेंडर प्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही कोणतीच वाढ करण्यात आली नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग 57 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेही नाही. सध्या पेट्रोल सर्वच ठिकणी शंभरी पार केली आहे. तर डिझेल 90 रुपयांच्या वर गेले आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ही लक्षणं दिसली तरी…’; केंद्राच्या राज्यांना सूचना

“त्याच्या छाताडावर उभं राहून…”, मुख्यमंत्र्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

31st निमित्त पुण्यातील वाहतूकीत बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते बंद राहणार

“तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं, मी अंघोळ करता करता…”

सोनम कपूरची सुधीर मुनगंटीवार यांच्यावर घणाघाती टीका, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More