ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचं निधन

मुंबई | ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचं आज निधन झालं. छातीत दुखू लागल्यानं त्यांना मुंबईच्या कोकीळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

चित्रपटसृष्टीत रिमा लागू यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मराठी नाटक, चित्रपट आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या