बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्न पार पडताच नवऱ्याचा हात लावून घेण्यास नवरीचा नकार, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | लाॅकडाऊनमुळे अनेकांची लग्न लांबवण्यात आली होतीत. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत तर लग्नाचा सिझन चालू असल्याचं चित्र आहे. लग्न म्हणलं की काहीतरी गम्मत नाही तर मनाला लागणारी घटना घडतीच. तर या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल होतात. अशातच सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

संबंधित व्हिडीओ हा कुठला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. अनेक ठिकाणी लग्नाच्या आधी घरातील मोठे लोक लहानांना लग्नाची संमती विचारत नाहीत. यामुळे अनेकांची लग्न ही त्यांच्या मर्जीविरुद्ध होतात. असंच काहीसं या व्हिडीओमध्ये देखील दिसून येत आहे. लग्नाच्या सर्व विधी पार पडल्यानंतर जेवताना नवऱ्याने नवरीला भरवणं ही एक पद्धतच आहे. मात्र संबंधित व्हिडीओमध्ये नवरीने जे केलं ते पाहून सर्वांना प्रश्न निर्माण झाला आहे.

या व्हिडीओमध्ये नव्याने लग्न झालेला जोडा जेवायला बसलेला पाहिला मिळतं. यानंतर नवरा त्याच्या बायोकाला इडलीचा तुकडा भरवण्यासाठी हात पुढे करतो. मात्र नवरी नकार देत स्वतःचा चेहरा साईडला करते. यामुळे हे लग्न नवरीच्या मर्जी विरुद्ध झालं आसल्याचं म्हटलं जात आहे. याबाबतच्या अनेक कमेंट्स देखील या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आपल्या नवऱ्याच्या हातून नवरीने घास खाण्यास नकार का दिला याचं कारण स्पष्ट झालं नसून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील ऑफिशयल निरंजन या आकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला 50 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.

पाहा व्हिडीओ:

थोडक्यात बातम्या-

…म्हणून पठ्ठ्यानं टी-शर्टवरवरच छापलं वॅक्सिनेशन सर्टिफिकेट, पाहा फोटो!

लाल किल्ल्यावरील नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे एकाच ठिकाणी!

लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील ‘इतक्या’ रुग्णांना डेल्टा प्लसची लागण!

‘…याला म्हणतात ओळख’; लस घेण्यासाठी अनोखा जुगाड, पाहा व्हिडीओ

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More