नोंदणी विवाहासाठीची प्रक्रिया काय असते?, अर्ज ते कागदपत्रे सर्व माहिती जाणून घ्या

Registration Marriage Process

Registration Marriage Process | तुळशी विवाहानंतर देशभरात सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. भारतात विवाहावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. अगदी लग्नाच्या तयारीपासून ते कपडे, डेकोरेशन आणि खाद्यपदार्थांवरही लाखोंचा खर्च केला जातो. बऱ्याचदा विवाहमध्ये मुलीकडच्या मंडळींना आर्थिक भार सहन करावा लागतो. मात्र आता या खर्चिक विवाह ऐवजी नोंदणी विवाहाला आताची जोडपे अधिक प्राधान्य देताना दिसून येत आहे. अनेक जोडपे आता साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेत आहेत. (Registration Marriage Process )

पुण्यातील सहदुय्यम निबंधक कार्यालयात जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत तब्बल 5799 नोंदणी विवाह पार पडले आहेत. आता या नोंदणी विवाहासाठी नेमकी प्रक्रिया काय असते?, यासाठी किती खर्च येतो तसेच यासाठी कागदपत्रे कोणती लागतात?, याबाबत जाणून घेऊयात.

नोंदणी विवाह प्रक्रिया-

सर्वप्रथम वर आणि वधू यांना विवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोटीस देणे आणि 30 दिवसानंतर विवाह करणे अशा दोन कामांसाठी जावे लागते. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन असते. यासंबंधी ऑनलाइन सर्व अर्ज करता येतो. (Registration Marriage Process )

नोंदणी विवाहाचा खर्च किती?

नोटीससाठी शंभर रुपये तर विवाह नोंदणीसाठी दीडशे रुपये लागतात. विवाह नोंदणीसाठी जोडप्याला 250 ते 300 रुपये साधारणपणे खर्च येतो. विशेष म्हणजे विवाहसाठी ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे भरले जाऊ शकतात. त्यामुळे घरबसल्या देखील यासाठी अर्ज करता येतो.

कागदपत्रे कोणती लागतात?

वर आणि वधू दोघांचे आधार कार्ड
वयाचा पुरावा
टीसी किंवा सनद
वधू किंवा वर या दोघांपैकी एकजण स्थानिक किंवा जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक
मुलीचे वय 18 तर मुलाचे वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे. (Registration Marriage Process )

पालकांची संमती नसेल तर?

पालकांची संमती नसल्यास विवाह होतो का?, असा प्रश्न बऱ्याचदा जोडप्यांना पडतो. अनेकदा प्रेमविवाह करणारी जोडपे नोंदणी पद्धतीने विवाह करण्याला अधिक प्राधान्य देतात. मग अशावेळी कुटुंबाचाही त्याला विरोध असतो. आता नोंदणी विवाह करताना या गोष्टीचा फरक पडतो किंवा काही अडचणी येतात का?, असे प्रश्न निर्माण होतात. मात्र, नोंदणी विवाह करण्यासाठी पालकांची संमती नसल्यास देखील विवाह होऊ शकतो. (Registration Marriage Process )

दरम्यान, पुण्यात मागील वर्षात जवळपास 6000 नोंदणी विवाहाची नोंद झाली आहे. तर मागील पाच वर्षांचा विचार केल्यास 2019 मध्ये पुण्यात 7059 नोंदणी विवाह, 2020 मध्ये जवळपास साडेपाच हजार नोंदणी विवाहाची नोंद झाली. तर 2021 मध्ये 7546, 2022 मध्ये 7558 आणि 2023 मध्ये 5400 तर 2024 मध्ये 5799 नोंदणी विवाहची नोंद झाली आहे. अधिक माहितीसाठी शासनाच्या या लिंकवर भेट देता येईल.  https://igrmaharashtra.gov.in/Marathi/marriage_registration

News Title :  Registration Marriage Process

महत्त्वाच्या बातम्या-

वाल्मिक कराड शरण आला ‘त्या’ गाडीबाबत धक्कादायक दावा समोर!

नववर्षात ग्राहकांना झटका, सोन्याची पुन्हा मोठी भरारी; बघा आजचे लेटेस्ट दर

लाडक्या बहीणींना सरकारचा धक्का, ‘ही’ एक चूक अन् तुमचा अर्ज होणार बाद

नवीनवर्षात इंधनदरात मोठा दिलासा, पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?

नववर्षातील आज पहिली विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींची करणार इच्छापूर्ती!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .