बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममतांना मोठा झटका; हा महत्वाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला

नवी दिल्ली | पश्चिम बंगालचं नाव बदलून ‘बंगाल’ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभेने 2016 ला राज्याचं नाव बदलून ‘बांगला’ करण्याचा ठराव संमत केला होता. या ठरावात बंगालीत ‘बांगला’, इंग्रजीत ‘बेंगाॅल’ तर हिंदीत ‘बंगाल’ असा पश्चिम बंगालचा उल्लेख करावा असं नमूद केलं होतं.

विरोधी पक्ष काँग्रेस, भाजप आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी ममतांच्या या प्रस्तावाला जोरदार विरोध केला होता.

केंद्र सरकारने एकाच राज्याच्या तीन नावावरून आक्षेप घेतला होता. त्यानंंतर राज्य मंत्रिमंडळाने 8 डिसेंबर 2017 ला एक प्रस्ताव संमत केला. त्यात सर्व भाषांमध्ये ‘बांगला’ नाव ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या-

-मॅच इंग्लंड-न्यूझिलंडची अन् टेन्शन पाकिस्तानला….!

टिक टॉकची जादू… ३ वर्षापूर्वी घर सोडून गेलेला नवरा बायकोला परत मिळाला!

-“अनेकदा लढाईत मी एकटा पडलो पण लढत राहिलो याचा अभिमान”

-ट्वीटरवरून राहुल गांधींनी दिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा; पुढच्या अध्यक्षपदाच्या नावाचा पेच कायम

-वंचितने दिली काँग्रेसला ऑफर; विधानसभेसाठी आम्ही ‘इतक्या’ जागा सोडू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More