“.. म्हणून रेखा यांनी पुन्हा लग्न केलं नाही”; धक्कादायक खुलासा समोर

Rekha | 70 च्या दशकातील अभिनेत्री रेखा आजही भल्या भल्या अभिनेत्रींना त्यांच्या सौंदर्याने आणि अदांनी मागे टाकतात. रेखा अजूनही चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. तसंच अनेक कार्यक्रमात त्या सहभागी होताना दिसून येतात. त्यांची रिअल लाईफही चित्रपटाच्या कथानका इतकीच रंजक (Rekha) राहिली आहे.

एका विवाहित अभिनेत्यासोबतच्या त्यांच्या अफेअरच्या कहाण्या इतक्या लोकप्रिय होत्या की त्या आजही स्मरणात आहेत. रेखा यांनी एका मोठ्या उद्योजकाशी लग्न केलं होतं. पण लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यांनंतर ते वेगळे झाले.

अभिनेत्री रेखा यांनी 15 एप्रिल 1990 रोजी मुंबईतील जुहू येथील मुक्तेश्वर देवालय मंदिरात दिल्लीतील व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या काही दिवसांतच रेखा यांना पतीबद्दल काही गोष्टी समजल्या. यामुळे त्यांच्यात सतत वाद-विवाद व्हायचे. लग्नाच्या अवघ्या 6 महिन्यांनंतर रेखा यांच्या पतीने स्वतःचं आयुष्य संपवलं.

रेखा यांचं पहिलं लग्न का मोडलं?

पतीचा मृत्यू झाल्यानंतर अनेकांनी रेखा यांना वाईट शब्द सुनावले. एका मुलाखती दरम्यान, रेखा यांनी आपल्या पर्सनल लाईफबद्दल खुलासा केला होता. ‘जर दोन व्यक्तींमध्ये काही मतभेद असतील आणि ते दूर होणार नसतील तर विभक्त होणं एकच पर्याय असतो.  लंडन याठिकाणी आम्ही हनीमूनसाठी गेलो होतो. पण तेव्हाच मुकेश सोबत माझ्या नात्यामध्ये असलेले फरक मला दिसून आले’, असं रेखा म्हणाल्या होत्या.

काही मीडिया रिपोर्टनुसार, रेखा यांनी दोन लग्न केली आहेत.दिवंगत अभिनेते विनोद मेहरा यांच्यासोबत देखील रेखा यांचं लग्न झालं होतं, असं म्हटलं जातं. मात्र, विनोद मेहरा आणि रेखा यांच्या नात्याचा स्वीकार कधीच अभिनेत्याच्या आईने केला नाही. यानंतर रेखा यांनी कधीच पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला(Rekha) नाही. त्यामुळे आता सध्या त्या एकट्या आयुष्य जगतात.

रेखा आणि अमिताभ यांचं नातं

रेखा(Rekha) यांचं नाव अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशीही जोडलं गेलं होतं. दोघे बरीच वर्ष नात्यात होते. मात्र, अमिताभ बच्चन यांनी जया यांच्याशी विवाह करत संसार थाटला. अजूनही रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा रंगत असते.

News Title –  Rekha and mukesh relationship

महत्त्वाच्या बातम्या- 

…असं झालं तर वाहनांची किंमत तब्बल 4 लाख रुपयांनी कमी होणार

“मी संसदेत प्रश्न मांडते तेव्हा मझ्या पतीला…”; सुप्रिया सुळेंचा अत्यंत गंभीर आरोप

“अजित पवार बारामतीत पराभूत होणार”; ‘या’ खासदाराने केली भविष्यवाणी

“आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार”

ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 70 हजारांवर, चांदीचेही दर वाढले