अजित पवार गटाला वडगाव शेरीत मोठा धक्का, टिंगरेंसह ‘या’ बड्या नेत्यांनी तुतारी फुंकली

Rekha Chandrakant Tingre | विधानसभा निवडणुकीला सहा दिवस बाकी आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून येत्या काही दिवसात राज्यातील निवडणूका पार पडतील. त्यासाठी राजकीय पक्षातील नेते मंडळी निवडणुकीचा जोरदार प्रचार करत आहेत.

मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं असलं तरी काही पक्षात अजूनही इनकमिंग सुरूच असल्याचं दिसतंय. यात शरद पवार गटात प्रवेशासाठी नेत्यांची रिघ पाहायला मिळाली. यामुळे अजित पवार गटाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.

अजित पवारांना धक्का

पुण्यातील वडगाव शेरीत अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. समोर आलेल्या माहितीनूसार, रेखा चंद्रकांत टिंगरे (Rekha Chandrakant Tingre) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे.

सुनील टिंगरेंच्या अडचणी वाढल्या

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनीही शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. दरम्यान पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील भाजपमध्ये असलेल्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे (Rekha Tingre) आणि चंद्रकांत टिंगरे (Chandrakant Tingre) या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दोघांच्या पक्ष प्रवेशाचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांना होणार आहे.

याशिवाय, धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी देखील तुतारी फुंकली आहे. दरम्यान, यावेळेस उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचं योगदान राहिल असा शब्द देखील दिला. याचबरोबर, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रतोद रामभाऊ भोकरे यांनी देखील शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे.

News Title : Rekha chandrakant tingre join ncp sharadchandra pawar group

महत्त्वाच्या बातम्या-

“येत्या सहा महिन्यात मोदींचं सरकार पडणार”; खळबळजनक दावा समोर

बाणेर-बालेवाडीचा पाणी प्रश्न अखेर मिटला, चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश

“आम्ही धर्मयुद्ध लढत बसू अन् तिकडे अमृता फडणवीस रील बनवत..”; ‘या’ नेत्याचा टोला

ऐन निवडणुकीत दुःखद बातमी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराचं निधन

“तुम्ही ज्यावर प्रेम केलं, तो सूरज आता तसा नाही…”; कोकण हार्टेड गर्लने वादावर मौन सोडलं