अहमदनगर | 3 महिन्यांपूर्वी घडलेल्या रेखा जरे हत्याकांडांनं जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली. या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असलेला पत्रकार बाळ बोठे याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी पोलिसांनी पारनेर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर निकाल देत बोठे याला फरार घोषित करून त्याला न्यायालयात हजेरी लावण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच या कालावधीनंतर संपत्ती जप्तीची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिस अधिक्षक अजित पाटील यांनी दिली आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोऱ्हाडे यांनी हा अर्ज मंजूर केल्यानं आरोपी बोठे याला कायदेशिररीत्या फरार घोषित करण्यात आलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानुसार आता पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू करण्यात येणार आहे. पाटील यांनी सांगितलेल्या माहितीनुसार फरार घोषित करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात उपस्थिती लावण्यासाठी एका महिन्याचा कालावधी दिला जातो.
पोलिस आरोपीचे छायाचित्र सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करू शकतात किंवा सदर आरोपीची संपत्तीही जप्त केली जाऊ शकते. मात्र यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करून परवानगी मिळवावी लागते. न्यायालयाच्या या निर्णयाने आरोपी बोठे याला न्यायालयात हजेरी लावावी लागणार असून त्यानं हजेरी न लावल्यास त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान रेखा जरे हत्याकांडाला 3 महिने उलटून गेले असताना आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. पोलिसांना बोठेचा कसलाही मागमूस नव्हता. या कारणामुळे न्यायालयातून बोठेला फरार घोषित करणं हा एकमेव पर्याय उरला होता.
थोडक्यात बातम्या-
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप; अजित पवार म्हणाले, आजच…
उपसरपंच निवडीवरून वाद, ग्रामपंचायत सदस्याची हत्या
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर राज्यपालांचा मोठा निर्णय
बेन स्टोक्सला विराट भिडला, भर मैदानात ‘राडा’, पाहा व्हिडिओ
…म्हणून कोरोना प्रवीण दरेकरांच्या जवळ गेला नसेल; अजित पवारांनी पिकवला हशा
Comments are closed.