अहमदनगर | यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा जरे हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्रकार बाळ ज. बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची सोमवारी (दि. ३०) नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव फाट्यानजीक हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केलेली आहे. पोलीस मुख्य सुत्रधाराच्या शोधात होते.
गुरुवारी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि गुन्ह्याचा उलगडा केला. या प्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपी व्यतिरिक्त पत्रकार बाळ ज. बोठे देखील सामील असल्याचं निष्पन्न झाल्याचं त्यांनी सांगितलंय.
दरम्यान, बाळ बोठे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बाळ बोठे आणि सागर भिंगारदिवे यांनी हत्येची सुपारी दिल्याचं इतर आरोपींनी सांगितल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
थोडक्यात बातम्या-
पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!
प्रियकरानं गुपचूप लग्न उरकल्यानं प्रेयसी संतापली; रागाच्या भरात केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य
राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा अभाव आहे; शरद पवारांचे स्पष्ट मत
भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण
बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण