अहमदनगर । यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्ये प्रकरणात नवी घडामोड घडलीये. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केलीये.
आज बाळ बोठे याच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी घरातून शस्त्र जप्त करण्यात आले. मात्र याच्याकडे शस्त्राचं लायसन्स असल्याचं समोरं आलंय.
शिवाय बाळ बोठे हे देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी विमान प्राधिकरणाला देखील सूचना देण्यात आल्यात.
30 नोव्हेंबर रोजी रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाली होती. चौकशीअंती पत्रकार बाळासाहेब बोठे याने हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाला पळवून लावण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी खा; नवा निष्कर्ष आला समोर!
बाटलीबंद पाण्याची चव आता बदलणार; जाणून घ्या काय आहे कारण!
दिल्लीतील शेतकरी आंदोलकांचा मोदी सरकारला अल्टिमेटम; घेतला हा मोठा निर्णय!
राज्य सरकारच्या पाठपुराव्याला यश, मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची मोठी माहिती