आरोग्य कोरोना मनोरंजन

‘हे’ कारण देत कोरोना टेस्ट करण्यास रेखाने दिला नकार!

मुंबई | ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील करण्यात आला आहे. रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतल्या वांद्रेमध्ये बँडस्टँड परिसरात त्यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे. मुंबई महापालिकेने बंगल्याचा परिसर सॅनिटाइज करून प्रतिबंधित क्षेत्र असल्याचं फलकही लावलंय. सुरक्षारक्षकाच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात येतेय मात्र रेखा यांनी कोरोना चाचणी करण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेखा यांच्या कोरोना चाचणीसाठी बंगल्यावर गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना गेटवरून परत फिरावं लागलं. रेखा त्यांचा मॅनेजर फरझाना आणि इतर तीन कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीसाठी पालिकेचे कर्मचारी बंगल्यावर पोहोचले होते. मात्र बंगल्याचा दरवाजाच कोणी उघडला नाही.

फरझाना यांनी दार न उघडताच आतून आवाज दिला आणि बंगल्याच्या फोनवर कॉल करून बोलण्यास सांगितलं. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी फरझाना यांना फोन केला असता रेखा यांची तब्येत बरी असून त्या कोणाच्याही संपर्कात आलेल्या नाहीत असं सांगण्यात आलं.

रेखा यांचा बंगला सॅनिटाइज करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी गेले होते. मात्र ते काम देखील अपूर्ण राहिलं. त्यावेळी देखील दरवाजा उघडण्यात आला नाही. अखेर कर्मचारी बंगल्याच्या बाहेर व आजूबाजूचा परिसर सॅनिटाइज करून परतले असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात जाणाऱ्या मार्गावर ‘या’ तीन ठिकाणी 24 तास होणार कडक तपासणी

वारी साधेपणाने झाली, बकरी ईदही साधेपणाने करु- उद्धव ठाकरे

’26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री…’; सचिन पायलट यांना कमी वयात काँग्रेसने अनेक जबाबदाऱ्या दिल्या

गणपतीसाठी कोकणात जाता येणार का?; आढावा बैठकीनंतर अनिल परब यांनी केली मोठी घोषणा

लाल किल्ल्यावर यंदा कोरोनामुक्त योध्यांना निमंत्रण, विध्यार्थी, VVIP नसणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या