अहमदनगर | यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रखा जरे यांची 1 डिसेंबरला हत्या झाली होती. जरे यांच्या हत्येने शहरात खळबळ उडाली होती. मात्र पोलीस तपासात जरे यांच्या हत्येची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रेखा जरे यांची हत्या सुपारी घेऊन करण्यात आली असल्याचं पोलीस तपासात उघड झाल्याचं कळतंय. पोलिसांनी राहता तालुक्यातील कोल्हार परिसरातून दोघा आरोपींना आणि कोल्हापूरमधून एकाला अटक केली आहे.
आरोपींनी रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी घेतली असल्याचं कबुल केलं आहे. त्यामुळे रेखा जरे यांच्या हत्येमागे काय कारण आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सुरूवातील गाडीला कट मारल्याच्या कारणावरून हल्ला झाला असं सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. मोटरसायकल क्रमांक एम एच 17-2380 वरून आलेल्या दोन जणांनी गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद घातला होता आणि त्यानंतर रेखा जरे यांच्यावर हल्ला केला होता.
महत्वाच्या बातम्या-
मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही- संजय राऊत
“माझ्याकडे 13 एकर आहे… तुला काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये”
“उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही”
“अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’”
भाजप खासदार आणि अभिनेते सनी देओल यांना कोरोनाची लागण