Rekha | मनोरंजन विश्वात अनेक गोष्टी, किस्से घडताना दिसतात. अशातच सध्या मनोरंजन विश्वातील एक चर्चेचा विषय आता समोर आला आहे. अभिनेत्री रेखा ही आजही चर्चेचा विषय ठरत आहे. रेखा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नात्याची जोरदार चर्चा होती. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे रेखा या नेहमीच चर्चेत असतात. 1984 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत रेखा (Rekha) यांनी लग्न आणि कुटुंबावर भाष्य केलं आहे. रेखा यांनी आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
“आई होण्याची माझी इच्छा पूर्ण होईल…”
रेखा (Rekha) म्हणाल्या की, मला खूप सारी लहान मुलं हवी आहेत. मला विश्वास आहे की आई होण्याची माझी इच्छा पूर्ण होईल, मात्र मला विवाहानंतर आई व्हायचं आहे. माझी आई कायम म्हणायची की, 30 व्या वयापर्यंत मुलांना जन्म द्यायला हवा. आई जे म्हणायची ते मला खरं वाटायचं. मला असं वाटायचं की माझ्या मुलाने माझ्यासोबत मोठं व्हावं. माझ्यात आणि मुलांमध्ये कोणतेही मतभेद नसावे असं मला वाटायचं. कारण मी नेहमी 100 वर्षे पुढचा विचार करते, असं रेखा म्हणाल्या.
मी माझ्या घरात स्वत:ची प्रायव्हसीचा आनंद घेत असते. पण घरातील एकाकीपणा खायला उठतो. त्यासाठी तो एकाकीपणा कमी करण्यासाठी मला माझं बाळ हवंय. माझं घर मुलांनी भरलेलं हवंय. पण मला लग्नाआधी आई व्हायचं नाही. कारण मी माझ्या आईला पाहिलं आहे. वडिलांनी मला सांभाळलं नाही.
एकट्या आईने आम्हाला सांभाळलं. लहानाचं मोठं केलं आहे. त्यामुळे एका व्यक्तीने आपल्या मुलांचा सांभाळ करणं कठीण असल्याचं रेखा म्हणाल्या. त्यामुळे माझ्या बाळाचा जन्म कधी होईल? कदाचित होऊ शकत नाही, असं देखील रेखा अनेक वर्षांपूर्वी म्हणाल्या आणि ते सत्य झाल्याचं दिसून आलं. आजही रेखा (Rekha) आई होऊ शकल्या नाहीत.
विवाह हऊनही रेखा आई होऊ शकल्या नाहीत
दरम्यान रेखा या अमिताभ बच्चन यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर रेखा (Rekha) यांनी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. काही महिन्यानंतर मुकेश यांनी स्वत:ला संपवलं. त्यानंतर रेखा या आई होऊ शकल्या नाहीत.
News Title – Rekha Wants Many Kids For Live Happy Life
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद, प्रवाशांचे प्रचंड हाल
“माझी हात जोडून विनंती…”; महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहता राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
पुण्यावर जलसंकट! रस्त्यांना नदीचे रूप, अनेक इमारती पाण्याखाली; पाहा Video
पूरजन्य परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला नागरिकांना धीर; म्हणाले..
“माझी तीन दुकानं बुडाली, त्याचा खर्च कोण देणार?”; संतप्त पुणेकराचा सवाल