बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लक्षण कोणतीही असली तरी डॉक्टर सांगायचा कोरोना त्यानंतर…; ग्रामस्थांनी अशाप्रकारे फोडलं बिंग

लखनऊ | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार अतिशय वेगाने झाला आहे. यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा सर्व ताण देशातील आरोग्य यंत्रणेवर आला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहे. अशा संकटकाळातही अनेक डाॅक्टर पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.

अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद येथे घडल्याचं समोर आलं आहे. येथील राकेश नावाच्या डॉक्टरनं कोणत्याही डिग्रीशिवाय गावातील लोकांवर उपचार केले असल्याचं समोर आलं आहे. तेथील एका गावकऱ्यानं वडिलांना सर्दी-खोकला झाल्यानं डाॅक्टरला घरी चेकअप करण्यासाठी बोलावलं. मात्र डाॅक्टरनं फक्त हात लावून तपासलं आणि रुग्णाला कोरोना झाल्याचं सांगितलं. कोणतंही चेकअप न करता कोरोना झाल्याचं सांगितल्यानं रागावलेल्या नातेवाईकांनी डाॅक्टरला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

डाॅक्टर राकेशला बेदम मारहाण केल्यानं त्याला डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे राकेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना समजले की, डॉक्टर गावातील लोकांना कोरोनाची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळून घेत असे. पैसे दिले नाहीत, तर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला याची माहिती देऊन कोरोना वॉर्डात 14 दिवसांच्या आयसोलेशनसाठी पाठवून देईन, अशी धमकी डॉक्टर देत होता, असाही आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिविर इंजेक्शन आणि रुग्णांसाठी बेड या सर्व गोष्टींचा तुटवडा सध्या भासतोय. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

थोडक्यात बातम्या – 

शुल्लक कारणाने सासरच्यांकडुन छळ; पुण्यात राहत्या घरी गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोर घेतला शेवटचा श्वास; ह्रदय पिळवटून टाकणारी घटना!

…..म्हणून लसीकरण प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करु नका

तहानलेल्या गरूडाची तरूणाने अशा पद्धतीने भागवली तहान, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘उद्धव, मी तुझी शिक्षिका…’; उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटलांना शिकवलेल्या शिक्षिकेची आर्त हाक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More