Top News

करीम लाला हे फक्त इंदिरा गांधी यांनाच नाही तर….. ;करीम लालाच्या नातवाचा गौप्यस्फोट

मुंबई | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंडरवर्ल्ड डाॅन करीम लाला यांची भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर देशभर वादळ निर्माण झालं. त्यावर आता नव नवे खुलासे होत आहेत. यावर होय, माझे आजोबा फक्त इंदिरांंनाच भेटत नव्हते तर अनेक मोठ्या नेत्यांना भेटत होते, असा खुलासा करीम लालाच्या नातवानं केला आहे. करीमलाला यांचे नातू सलीम खान आणि जहानजेब खान यांनी हा खुलासा केला आहे.

करीमलाला हे फक्त इंदिरा गांधी यांनाच नाही तर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राजीव गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना भेटत असतं. करीमलाला यांचा अंडरलवर्ल्डही काहीही संबंध नव्हता. ते पठाणांचे नेते होते, असं करीम लालाच्या नातवानं म्हटलं आहे.

सरहद गांधी खान अब्दुल गफ्फार खान हे जेव्हा मुंबईत येत तेव्हा ते करीमलाला यांच्याकडे येत जात होते, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राऊतांवर भाजपसह काँग्रेसनेही टीका केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

10 मिनिटे सुरक्षा बाजूला ठेव… मग बघ ‘मराठे’ तुझी कशी अवस्था करतात- नितेश राणे

आई-वडील शेतकरी, पोरगा बनला सीए…

‘धोनी आता बस्स कर’; BCCI चे धोनीला अप्रत्यक्ष संकेत

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या