बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

90 वर्षीय कोरोनाग्रस्त आजीला जंगलात सोडून निर्दयी नातेवाईक फरार

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये माणुसकीच्या नावावर काळिमा फासणारी घटना घडली आहे. औरंगाबादमध्ये एका 90 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आजीबाईंना त्यांच्या नातेवाईकांनीच जंगलात सोडून दिलंय.

औरंगाबादमधील कच्चीघाटी परिसरात काही नातेवाईकांनी आपल्या 90 वर्षीय कोरोनाबाधित आजींना थेट जंगलात सोडलं. जर्जर म्हाताऱ्या आजींना जंगलात टाकून संबंधित नातेवाईक फरार आहेत.

या आजींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर मरणासन्न अवस्थेत जंगलात सोडण्यात आलेल्या आजींची प्रकृती आता स्थिर आहे.

आजीला जंगलात सोडून पळून गेलेल्या नातेवाईकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच या नातेवाईकांना अटक होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाईसाहेब जरा धीराने घ्या, अमृता फडणवीसांना माजी पोलिस अधिकाऱ्याचे खरमरीत पत्र

या गोष्टीशिवाय कोरोनावर मात करणं अशक्य, अजित पवारांचं परखड मत!

केंद्र सरकार आधी मुकं तर होतंच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालंय- राहुल गांधी

उद्धव ठाकरेंचा पुन्हा ‘चहूमुलखी डंका…’, सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत बेस्ट 5 मध्ये!

कोरोना तर आलाच पण तो एकटा नाही आला तर…., अमेरिकन संशोधनातून चिंताजनक बाब समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More