बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. सर्व राज्यांतील उच्च स्तरीय समितीने गेल्या वर्षी जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार कैद्यांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

गेल्या वर्षी कोर्टाने सर्व कैद्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अनेक कैद्यांना सोडण्यात आलं होतं. त्यानंतर सोडण्यात आलेले सर्व कैदी परत तुरुंगात आले आहेत. अनेक तुरुंगामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी भरलेले आहेत. त्यामुळे कैदी आणि कर्मचारीही संक्रमित होत आहेत. याची दखल चीफ जस्टीस एन. व्ही. रमना यांनी घेतली आहे.

शुक्रवारी पुन्हा हा विषय कोर्टासमोर आला. ज्येष्ठ वकील कोलिन गोंजाल्विस यांनी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हे प्रकरण मांडले. कोरोनाचं संकट कमी झाल्याने कैदी परत तुरुंगात आले होते. सध्या अनेक तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. कोर्टाने या विषयी तात्काळ आदेश द्यावेत. उच्च स्तरीय समितीने निर्णय घेण्यात वेळ घालवू नये. त्यासाठी गेल्या वर्षी ज्या कैद्यांना सोडण्यात आले होते. त्यांना परत तुरुंगातून सोडण्यात यावं, असं गोंजाल्विस यांनी कोर्टाला सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या संकेतस्थळावर कैद्यांना सोडण्याचे आदेश अपलोड केले आहेत. राज्यांनी स्थापन केलेल्या उच्च स्तरीय समित्यांनी गेल्या वर्षी देण्यात आलेल्या निर्देशाचं पालन करावं. ज्या कैद्यांना गेल्या वर्षी सोडण्यात आलं. त्यांना पुन्हा सोडण्यात यावं, असं कोर्टाने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“रुग्ण कमी होत आहे म्हणून सुखावून जाऊ नका”

‘कोरोना सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोरोना रिपोर्टची आवश्यकता नाही’; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेश

संजय राऊतांनी ममता बॅनर्जींना दिली अहिल्याबाई होळकरांची उपमा, म्हणाले…

#सकारात्मक_बातमी | सात महिन्यांच्या बाळाची कोरोनासह ट्युमरशी यशस्वी झुंज

“मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतात, मग योग्य कोण?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More