अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ; रिलायन्स होम फायनान्स डिफॉल्टर यादीत
मुंबई | पंजाब आणि सिंध बँकेच्या 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाची परतफेड करू शकले नसल्याने रिलायन्स होम फायनान्स कंपनी डिफॉल्टरच्या यादीत गेली आहे. पंजाब अँड सिंध बँकेकडून रिलायन्स कॅपिटलच्या सहाय्यक कंपनी रिलायन्स होम फायनान्स 15 फेब्रुवारीला कर्जाची परतफेड करू शकले नसल्याने त्यांचं नाव डिफॉल्टर यादीत टाकण्यात आलं आहे.
रिलायन्स कॅपिटल ही कंपनी अनिल अंबानी यांच्या नियंत्रणात आहे. रिलायन्स फायनान्सने पाच वर्षांसाठी 9.25% व्याज दराने पंजाब अँड सिंध बँकेकडून दोनशे कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कंपनीने सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे 1500 कोटी पेक्षाही जास्त रोख रक्कम आहे. परंतु, दिल्ली उच्च न्यायालयाने 2019 मध्ये दिलेल्या आदेशामुळे कंपनी या रकमेचा वापर करू शकत नाही.
रिलायंस होम फायनान्स लिमिटेड कंपनीने रोख रक्कम असतानाही न्यायालयाच्या आदेशामुळे ही परतफेड करता आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 39 कोटींचे कर्ज आणि 15 लाख रुपयांचे व्याज न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांना भरता आलेले नाहीत.
याआधीही रिलायन्स कॅपिटल एनसीडीसाठी व्याज देण्यात अपयशी ठरली होती. एकूणच रिलायन्स कॅपिटलच्या डिफाल्टर यादीत येण्याची ही 49 वी वेळ आहे.
थोडक्यात बातम्या-
सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोनाची लस
कोणी काहीही म्हणू दे, महाराष्ट्र फर्स्ट हेच धोरण ठेवा- राज ठाकरे
‘हे राज्याला परवडणार नाही’; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं
…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील; रोहित पवारांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप
“सध्या देशाची परिस्थिती आणीबाणी बरी होती असं म्हणावं अशीच आहे”
Comments are closed.