बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंबानींची दर्यादिली; सामाजिक कार्यावर खर्च करण्यात रिलायन्स अव्वल

नवी दिल्ली | अंबानींच्या रिलायन्स समुहाची दर्यादिली पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना काळात सामाजिक कार्यावर कोणत्या भारतीय कंपनीने किती खर्च केला आहे याची एक यादी नुकतीच समोर आली आहे. भारतीय कंपन्यांनी यंदा सामाजिक कार्यावर खूप कमी खर्च केल्याचं समोर आलं आहे.

2020-21 या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी (CSR) भारतीय कंपन्यांनी 8828 कोटी रूपये खर्च केले आहेत. त्यातील सर्वाधिक निधी रिलायन्स इंडस्ट्रिजने (Reliance Industries) दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजने सामाजिक कार्यावर सर्वाधिक असा 922 कोटी रूपयांचा खर्च केला आहे.

रिलायन्स पाठोपाठ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) सामाजिक खर्चाच्या बाबतीत दुसरा नंबर पटकावला आहे. टाटा समूहाने सामाजिक कार्यावर 674 कोटी रूपये खर्च केले आहेत. तर 246 कोटी रूपयांचा खर्च करत या यादीत तिसरा क्रमांक विप्रो (Wipro) कंपनीने पटकावला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सीएसआर नियमांत सरकारने अनेक बदल केले आहेत. त्यानूसार, कोरोनासाठी कंपन्यांकडून करण्यात आलेला खर्च सीएसआर निधीमध्ये मोजला जात आहे. कोरोना काळातही रिलायन्सने मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठिंबा दिला होता.

थोडक्यात बातम्या-

ज्वालामुखीचा उद्रेक होताच जीव मुठीत घेऊन पळत सुटले लोक; धडकी भरवणारा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

‘शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात’; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

“देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं”

महिलेला मधलं बोट दाखवणं भोवलं; न्यायालयाने तरूणाला घडवली चांगलीच अद्दल

‘आता हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेने जाणार’; किरीट सोमय्यांच्या नव्या दाव्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More