बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशात ‘ही’ नवी पद्धत आलीये, काहीजण सुुपारी घेऊन काम करतात”

औरंगाबाद | सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदरराव अडसूळ यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर अडसूळ यांना ईडीने नोटीस पाठवली असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. ते औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

जात पडताळणी विषयावरील कारवाईचा बदला घेण्यासाठी राणा यांनी अडसूळांविरोधात तक्रार केली. त्यानंतर ही ईडीची कारवाई आनंदराव अडसूळ यांच्या झाली आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. ईडीने अडसूळांविरोधात केलेली कारवाई असो किंवा इतरांवर केलेली कारवाई हा भाजपकडून ईडीच्या माध्यामातून महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचे काम चालू असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

सुुपारी घेऊन काही जण काम करत आहेत. काय बोलतो आहोत, यांचे त्यांना भान नाहीत. अशा बदलाच्या भावनेतून आणि सुडबुद्धीने सध्या भाजप राजकारण करत आहेत. ही पद्धत देशात नव्याने रूजते आहे. अडसुळांविरोधात केलेली कारवाई ही अशाच प्रकारची आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपासून आनंदराव अडसुळ आणि रवी राणा यांच्यात वाद चालू आहे. अडसूळांविरोधात केलेली कारवाईमुळे महाविकास आघाडीला काहीही धोका नसून सरकार अधिक मजबुत होईल, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“हे शेतकऱ्यांचं आंदोलन, शिवसेनेचा ‘भारत बंद’ला मनापासून पाठिंबा”

‘केंद्र सरकार फक्त बोलतं, आता 10 वर्ष लागली तरी…’; राकेश टिकैत आक्रमक

“अमित शहा म्हणजे ‘गजनी’, भाजपला गजनीसारखा झटका येतो”

दोन वेळा तरी मुख्यमंत्रिपदाची संधी द्यावी- विजय वडेट्टीवार

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अमित शहांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More