बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिलासा, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा वीकेंड लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच होती. पण आजची आकडेवारी काही प्रमाणात दिलासादायक आहे.

2 दिवस कडक लाॅकडाऊन झाल्यानंतर आज राज्यात  51 हजार 751 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं, आज 258 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण 5 लाख 64 हजार 746 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

आज महाराष्ट्रातील एकुण 52 हजार 312 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातुन घरी पाठवण्यात आलं आहे.  महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊनच्या दिशेने बैठकांचं सत्र सुरू आहे.

संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे.  दिवसभरात पुण्यातुनही काही प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 4 हजार 849 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे, अशीच रूग्णसंख्या कमी होत राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

संभाजी भिडे यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

मावळ तालुक्यात पवनानगर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना CBI ने बजावला समन्स

दिलासादायक! मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आजची आकडेवारी

रविवारी राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, पाहा आकडे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More