बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा; सरकारकडून मदत जाहीर

मुंबई | महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे काढणीला आलेलं पीक पुर्णपणे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. मराठवाड्यातील तर अनेक भागात एवढ्या मोठ्या प्रमाणातस पाऊस झाला की, शेताला तलावाचं रूप आलं. परिणामी शेतकरी राजा मात्र चांगलाच अडचणीत सापडला.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. मात्र आता यावरच सरकारने सकारात्मक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. सरकारने आता शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीतून दिलासा देण्यासाठी मदतीची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टर 6 हजार 800 रूपये मदत मिळणार आहे तर बागायती शेतीसाठी सरकारकडून प्रति हेक्टर 13 हजार 500 रूपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. ही मदत येत्या 4 ते 5 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 46 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं असल्याचं बोललं जात आहे. संपुर्ण पंचनामे पुर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीबद्दलही निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना काही  प्रमाणात तरी राज्य सरकारकडून दिलासा मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

#IPL2021 अटीतटीच्या सामन्यात हैदराबादचा बंगळुरूवर ‘रॉयल’ विजय

“11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीने बंद पुकारलाय, लाज वाटली पाहिजे ठाकरे सरकारला”

‘जात साली जात साली जाता जाता जात नाय’; अवधूत गुप्तेंचं गाणं वर्षभराने व्हायरल

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More