बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेरण्या खोळंबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; ‘या’ जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

बुलडाणा | गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज अखेर बुलडाण्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत जिल्ह्यात जोरदार बॅटिंग सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी पेरण्यासाठी पावसाच्या प्रतीक्षेत होते.

दरम्यान, मान्सूनचं आगमन महाराष्ट्रात झालं होतं. त्यानंतर काही दिवस पाऊस पडला पण त्यानंतर महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस दडी मारुन बसल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्याचं दिसून आलं. पेरण्या खोळंबल्यामुळे चिंतेत असलेल्या बुलडाण्यातील शेतकऱ्यांना आज पावसाने दिलासा दिला आहे.

गेल्या जवळपास आठवडाभरापासून जिल्ह्यात पाऊस पडत नव्हता. पण आज बुलडाणा जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच आता जिल्ह्यात शेतकरी पेरणीलाही सुरुवात करतील.

हवामान विभागातर्फे काही दिवसांपूर्वीच येणाऱ्या काही दिवसात पाऊस पडणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी पेरणी लांबणीवर टाकत पावसाची वाट पाहत होते. त्यातच आज पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने बुलडाणा जिल्ह्यात खोळंबलेल्या पेरण्या आता सुरू होतील .

थोडक्यात बातम्या –

‘या’ जिल्ह्यातील 30 कोविड सेंटर बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; आरोग्य कर्मचारी बेरोजगार

नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल- चंद्रकांत पाटील

कसोटी विश्वचषकात ‘या’ भारतीय गोलंदाजाने मिळवले सर्वाधिक बळी, फलंदाजीत टॉप 3 मध्ये एकही भारतीय नाही

“तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो”

कोरोनाकाळात आता सरपंचांना मिळणार विमाकवच; ‘या’ जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More