तंत्रज्ञान

…तर तुम्हाला कॉलिंगसाठी पैसे द्यावे लागणार नाही; जिओची मोठी घोषणा

मुंबई | जिओच्या ज्या ग्राहकांचे डेटा प्लॅन सध्या सुरू आहेत त्यांना कॉलिंगसाठी तूर्तास कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही, असं जिओने स्पष्ट केलं आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या प्लॅनची मुदत संपल्यानंतर नवीन प्लॅन घेताना सशुल्क कॉलसाठीचा अतिरिक्त प्लॅन ग्राहकांना विकत घ्यावा लागेल, असं जिओने म्हटलं आहे.

जिओवरून अन्य मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीच्या सिमवर कॉल केल्यास प्रति मिनिट सहा पैसे आकारले जातील, अशी घोषणा जिओने केली होती. मात्र इंटरकनेक्ट चार्जेसपोटी अन्य कंपन्यांना द्यावा लागणाऱ्या शुल्कामुळे जिओने हा निर्णय घेतला आहे.

आययूसीच्या माध्यमातून जिओने एअरटेल व व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना एकूण 13,500 कोटी रुपये द्यावे लागले आहेत. हे शुल्क एक जानेवारीपासून रद्द होण्याची शक्यता असून ट्रायकडून यावर विचारमंथन सुरू आहे. ट्रायने हे शुल्क रद्द केल्यास सशुल्क कॉलिंगचा निर्णय आपोआप रद्द होईल, असं जिओने स्पष्ट केलं आहे.

आययूसी प्लॅनच्या बदल्यात जिओकडून ग्राहकांना अतिरिक्त डेटा दिला जाणार आहे. जिओ फोनवरून कोणत्याही लँडलाइन जोडणीला केले जाणारे कॉल तसेच, व्हॉट्सअप कॉल मोफत असतील.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या