तंत्रज्ञान

रिलायन्स जिओचा ग्राहकांना दुसरा मोठा धक्का!

नवी दिल्ली | रिलायन्स जिओनं ‘टॅरिफ शुल्क’ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या काही आठवड्यांमध्ये हे दर वाढतील, असं जिओकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. रिलायन्स जिओ ग्राहकांना या निर्णयाचा धक्का बसणार आहे.

वोडाफोन-आयडिया आणि एयरटेलनं याआधीच ‘टॅरिफ शुल्क’ वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं होतं, यानंतर आता जिओनेही हीच घोषणा केली आहे. मोबाईल सेवेच्या दरांमध्ये संशोधन करण्यासाठी ट्राय कंपन्यांसोबत चर्चा करणार आहे.

सध्यातरी ट्राय कंपन्यांकडून होणाऱ्या दरवाढीची वाट बघणार आहे, असं ट्रायनं सांगितल्याचं समजतयं.   ट्राय शुल्क वाढ नियमानुसार आहे का नाही ते पाहण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. स्वस्त दरात अनेक सुविधा भेटत असल्यानं ग्राहकांनी जिओला पसंती दिली होती. अतिरिक्त शुल्कात वाढ झाल्यानं ग्राहकांच्या आर्थिक अडचणीत वाढ होणार आहे.

दरम्यान, जिओनं याआधी दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी आययूसी व्हाऊचर आणलं होतं, आता टॅरिफ शुल्कही वाढवण्यात आलं आहे. जिओच्या या निर्णयाचा फटका असंख्य ग्राहकांना बसणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या