बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुकेश अंबानींची ‘या’ परदेशी कंपनीत मोठी गुंतवणूक; भारतीय उद्योगक्षेत्राला होणार फायदा

नवी दिल्ली | वाहने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सेमीकंडक्टरच्या कमरतेमुळे सध्या देशात अनेक अडचणी येत आहेत. मात्र आता रिलायन्स कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे या समस्येवर पर्याय उपलब्ध होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने जर्मनीच्या सेमीकंडक्टरसाठी लागणाऱ्या वेफरची निर्मिती करणाऱ्या नेक्सवेफ या कंपनीत गुंतवणूक केली आहे. ही कंपनी मोनेक्रिस्टलाईन सिलीकॉन वेफर्स तयार करते.

रिलायन्स कंपनीची ही गुंतवणूक भारतीय उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणार आहे. रिलायन्स कंपनीच्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलार लिमिटेड कंपनीकडुन ही गुंतवणूक करण्यात आली आहे. यासाठी कंपनीने 2.4 कोटी युरो म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 218 कोटी रुपये गुंतवले आहेत. रिलायन्सने नेक्सवेफशी केलेल्या भागीदारीमुळे सेमीकंडक्टरसाठी लागणाऱ्या वेफर्सची निर्मीती भारतातच करणं शक्य होणार आहे.

सेमीकंडक्टर हे प्रत्येक इलेक्ट्राॅनिक उपकरणासाठी आणि वाहनांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे सध्या या सेमीकंडक्टरची आयात कमी होत असल्याने  भारताच्या उद्योग क्षेत्रावर फार मोठा परिणाम झाला आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने हे सेमीकंडक्टर्स दुसऱ्या देशातुन आयात करण्याऐवजी भारतातच बनविण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान रिलायन्स कंपनीच्या या गुंतवणूकीच्या निर्णयामुळे भारताच्या उद्योगक्षेत्राला चालना मिळणार आहे.

याबाबत सांगताना रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, “ही नेक्सवेफसोबतची आमची भागिदारी महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात आहे. नेक्सवॅफमधील गुंतवणूकीमुळे ग्रीन एनर्जी आणि फोटोव्होल्टिकच्या निर्मीतीमध्ये जागतिक पातळीवर भारत पाय रोवणार आहे. त्याचबरोबर ही भागिदारी उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी मदत करणारी असेल”, असं अंबानी यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

समीर वानखेडेंच्या पाठीशी आहे ‘या’ व्यक्तीचा आशिर्वाद; क्रांती रेडकरने केला खुलासा

“महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती”

या अभिनेत्याला ओळखलत का? याआधी न्युड फोटोशुटमुळे आला होता चर्चेत

‘मी तुमच्यासाठी कपडे घालत नाही’, ट्रोलर्सवर भडकली ‘ही’ अभिनेत्री

महिन्याभरात सीएनजी गॅसचे दर दुसऱ्यांदा भडकले, जाणून घ्या नवे दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More