बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवार सर्जन आहेत”; पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांचे पुन्हा भाष्य

बेळगाव | शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या बेळगावात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. शुभम शेळके यांच्या समर्थनार्थ संजय राऊत यांनी बेळगावमध्ये प्रचार सभा घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अजित पवारच पहाटेच्या शपथविधीचे सर्जन आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

एकीकरण समितीचा उमेदवार शुभम शेळके हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि त्याला पाठिंबा देणं हे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे. आज जेव्हा त्याला पाठिंब्याची गरज आहे. त्यावेळी फडणवीस यांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्रातली जनता त्याची नोंद ठेवते, असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. अजित पवार यांना चांगलं माहिती आहे सरकारला कसा टेकू लावायचा. ज्यावेळी पहाटे सरकार बनलं आणि दुपारी कोसळलं. त्यानंतर पुन्हा ते बनलं, त्यामुळं ऑपरेशनचे अजित पवार सर्जन आहेत, असा टोलाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.

सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देणं महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टीका केल्याने मला वाईट वाटलं नाही, मात्र ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वातच विधानसभेत बेळगाव-कारवार यांना पाठिंबा देण्याचे ठराव केलेले आहेत. पाठिंब्याची गरज होती, त्यावेळी त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं बेळगावात येऊन मराठी माणसाला पाठिंबा द्या, असं राऊतांनी सांगितलंय.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांना बेळगावसाठी तीन वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला होता. त्या शिवसेनेचे आम्ही पाईक आहोत, त्यामुळे आमचे मराठी प्रेम काय आहे हे आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“तातडीने रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून द्या, अन्यथा…”

‘…तर आपण या संकटावर सहज मात करू’; राज ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

हरिद्वार कुंभमेळ्यात कोरोनाचं थैमान; इतक्या जणांना झाली कोरोनाची लागण

‘साहेब, घरात पकडलेले उंदीर सोडायला गेलो होतो’; घराबाहेर पडलेल्या तरूणाचं पोलिसांना अजब उत्तर

‘पैसा भी और इज्जत भी’; माॅरिसच्या खेळीवर विरेंद्र सेहवागची गुगली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More