Top News

सासूनं सोसले विधवेचे चटके; सुनेलाही ते बसू नयेत म्हणून करुन दिला पुनर्विवाह!

चोपडा | पुनर्विवाह असा शब्द जरी उच्चारला तरी अनेकांच्या भुवया उंचावतात. पुनर्विवाह व्हावा अशी इच्छा बऱ्याच जणांची असते मात्र स्वतःहून कोणीही पुढाकार घेत नाही. मात्र चोपडा तालुक्यात सासरच्यांनी सुनेचा पुनर्विवाह करून दिलाय.

सासरच्या मंडळींनीच आपल्या सुनेचा पुनर्विवाह करून समाजात एक चांगला आदर्श निर्माण केलाय. चोपड्यातील लव्हली ट्रेलरचे संचालक सचिन सुराणा यांचं 3 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यांची पत्नी रिना जैन फार कमी वयातच विधवा झाल्याने पुढच्या आयुष्याचं काय असा प्रश्न घरच्यांच्या समोर होता.

रिनाची सासू लिलाबाई सुराणा यांच्या पतीचं लवकर निधन झाल्याने त्या देखील कमी वयात विधवा झाल्या होत्या. यामुळे विधवा महिलेला काय यातना भोगाव्या लागतात याची जाणीव त्यांना होती. तसंच चांगला मुलगा मिळाला तर सुनेचं लग्न लावून देईन, असं त्या नेहमी सांगायच्या.

त्यांच्या इच्छेनुसार कुुटुंबियांनी स्थळ शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर लखीचंद नेमीचंद छाजेड यांचा मुलगा पुनमचंद ह्याला पसंद केलं. मुलाला देखील मुलगी पसंद आली असून 27 डिसेंबर रोजी यांचा विवाह संपन्न झाला. सासुनेच मुलगी समजून सुनेचा पुनर्विवाह करून दिल्याने सर्वांकडून कौतुक केलं जात होतं.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊत बोलले त्यामध्ये तथ्य असणार- जयंत पाटील

ईडीचा राजकारणासाठी वापर असं महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही- अनिल देशमुख

मोठ्या विधवा भावजयीसोबत दीर करणार लग्न; अहमदनगरमधील स्तुत्य घटना

अक्षय कुमारने वाढवलं मानधन; एका चित्रपटासाठी घेणार ‘इतके’ रूपये

“मी जर तोंड उघडलं तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या