बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुडन्यूज! भारतानं मान्यता दिलेल्या कोरोनाविरोधातील औषधाला मिळालं ‘हे’ मोठं यश

कोरोना विषाणूची लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन चालू असताना भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. नेचर मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात ‘रेमडेसीवीर’ या औषधाची कोरोना बाधीत माकडांवर चाचपणी करण्यात आली. या औषधाच्या वापराने माकडांना होणारा श्वसनाचा त्रास बरा झाल्याचं आढळून आलं आहे.

विशेष बाब म्हणजे भारताने सदर संशोधन प्रकाशित होण्याच्या पूर्वीच रेमडेसीवर औषधाच्या वापराला मान्यता दिली आहे. कोरोनाची तिव्र लक्षणे आढळून आल्यास बाधीत रूग्णांना हे औषध दिलं जाणार आहे. ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ कडून या औषधाची पूर्ण पडताळणी करून वापराचे निर्देश देण्यात आले आहेत.

संशोधनानुसार, ज्या माकडांवर औषधाची पडताळणी करण्यात आली होती. त्यांना श्वसनाच्या त्रासाची कसलीच लक्षणं आढळून आली नाही. कोरोना विषाणूने होत असलेल्या छातीच्या त्रासापासूनही माकडांचा बचाव केला. एवढंच नव्हे तर औषधाच्या सेवनाने माकडांच्या शरीरातील कोरोना व्हायरसचं प्रमाणही कमी झाल्याचं आढळून आलं.

संशोधनात सहभागी झालेल्या संशोधकांच्या मते, कोरोना बाधीत रूग्णांना निमोनिया पासून वाचविण्यासाठीचं रेमडेसीवर औषध त्वरित देण्यात यावं. कोरोना बाधीत रूग्णांना निमोनिया झाल्यास त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका असतो. तसेच ताप, खोकला व इतर आजार बळावण्याचीही दाट शक्यता असते. यासाठी रेमडेसीवर औषध प्रभावी ठरू शकतं.

अमेरिकेतील ‘नॅशनल इन्सिट्युट ऑफ हेल्थ’कडून रेमडेसीवीर औषधावर नुकतंच भाष्य करण्यात आलं. संस्थेच्या संशोधनानुसार, या औषधाचा श्वसनाचा कमी त्रास होत असलेल्या रूग्णांना बराच फायदा होऊ शकतो. याकाळात ऑक्सिजनची गरज नेहमीच्या तुलनेने जास्त असते. या औषधाच्या वापराने श्वसनात येणारा अडथळा दूर होऊ शकतो.

भारतातही आरोग्य सुविधा महानिर्देशकांच्या संयुक्त बैठकीत रेमडेसीवर संबंधी बैठक पार पडली. या औषधाची सध्या जगभरात प्रचंड मागणी असल्याचं समोर आलं आहे. विशेष बाब म्हणजे रेमडेसीवर औषधाची सर्वाधिक उत्पादन करणारी कंपनी ‘गिलीयड सायंसेज’ भारतात आहे.

गिलीयड सायंसेजच्या अधिकारी वर्गाची नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालय व ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया ( डिसीजीआई) यांच्यासोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत रेमडेसीवर औषध भारतात वितरित करण्यासाठी रोडमॅप ठरवण्यात आला. विशेष म्हणजे जनावरांत आढळणाऱ्या सार्स व मार्स या विषाणूंवरही हे औषध चांगलंच प्रभावी ठरलं आहे.

‘रेमडेसीवर’ हे औषध उत्तम प्रकारचं विषाणूरोधी ( अँन्टीव्हायरल) मानलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या चाचणी परीक्षेत हे कोव्हिड-१९ विषाणूच्या विरोधातील प्रभावी औषध ठरलं. २०१४  साली आफ्रिकेत पसरलेल्या इबोला व्हायरसच्या काळात या औषधाचा सर्वप्रथम वापर करण्यात आला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

या लोकांपासून वाढतोय कोरोनाचा धोका; असा करा स्वतःचा बचाव

भारतात या 8 औषधांच्या वापराने बरे झालेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!

महत्वाच्या बातम्या-

कठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा; ब्राह्मण महासंघाची मागणी

‘या’ गोष्टीमुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा करणार

“चक्रीवादळग्रस्तांना काहीच मदत मिळाली नाही, अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More